विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोविड पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे २१ जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर (लेव्हल्स) ठरवेल, असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे. सध्या राज्यात १६ हजार ५७० ऑक्सिजन बेडसवर रुग्ण असून ही संख्या ३५ हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही.
राज्यात त्या क्षेत्रातील कोव्हिड-१९ पॉझिटिव्हिटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजनसुविधायुक्त खाटा यांच्या आकडेवारीच्या आधारे बंधनांचे कोणते स्तर लागू करण्यात यावेत याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाने ४ जून रोजी जारी केले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी संपूर्ण राज्यात रुग्णांद्वारे वापरात असलेल्या ऑक्सिजनसुविधायुक्त खाटांची एकूण संख्या १६,५७० इतकी असून ही संख्या घट दर्शवणारी आहे. ही संख्या ३५ हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दिलेल्या आकडेवारीनुसार १७ जून रोजी विविध जिल्ह्यांतील ऑक्सिजनसुविधायुक्त खाटा आणि पॉझिटिव्हिटी दर तक्ता नमूद केला आहे. या आकडेवारीच्या आधारे, ४ जून रोजीच्या शासन आदेशाचा संदर्भ घेऊन त्या त्या प्रशासकीय क्षेत्रात कोणत्या स्तराची बंधने लागू करावीत, याबाबतचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी घेऊ शकतील. एखाद्या जिल्ह्यात एकापेक्षा अधिक प्रशासकीय क्षेत्रे असल्यास त्यांनी या आकडेवारीचे प्रमाणबद्ध विभाजन करून एक एका क्षेत्राचा निर्देशांक निश्चित करावा आणि त्यानुसार निर्णय घ्यावा.
वरील आदेशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याला या आदेशात उल्लेख केलेल्या विविध कामकाजावर बंधने लागू करण्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याच्या संमतीने बदल करण्याची मुभा दिलेली आहे. पायाभूत स्तरात बदल न झाल्यास आणि सध्या लागू असलेल्या आदेशानुसार बंधनांमध्ये कोणताही बदल प्रस्तावित नसल्यास अशाप्रकारच्या बदलांसाठी नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. बंधनाच्या स्तरात कोणताही बदल झालेला असल्यास आणि नव्या स्तरानुसार बंधनांत बदल प्रस्तावित केले असल्यास किंवा स्तर बदलला नसल्यास परंतु लागू असलेल्या बंधनांमध्ये बदल करायचा असल्यास, अशी पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. बंधनांचा कोणताही स्तर कोणत्याही बदलाविना लागू करावयाचा असल्यास संमतीची आवश्यकता नाही अशा सूचना आदेशात दिलेल्या आहेत.
स्थानिक प्रशासनाने प्रत्येक क्षेत्रासाठी घोषित करण्यात आलेल्या स्तरांची अंमलबजावणी सोमवार दिनांक २१ जून पासून लागू करावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेली जिल्हानिहाय स्थिती अशी
निर्बंधांचे स्तर
राज्य भरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर तर बनविण्यात आले आहे. या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी भरलेले ऑक्सीजन बेडच्या दैनंदिन टक्केवारीवर अवलंबून असेल. प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रात सदर स्तरांच्या आधारे निर्बंध उठवतील. याकरिता विभिन्न मापदंड आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्व खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.
स्तर १– ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील.
स्तर २ – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल.
स्तर ३- पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सीजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.
स्तर ४- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के दरम्यान असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.
स्तर ५- जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.
साधारण मार्गदर्शक तत्त्वे:-
पहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर, जे लोकल ट्रेनने प्रवास करतात, किंवा लग्नसमारंभातील गर्दी.
स्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध, तर तिसऱ्या स्तरासाठी पाच वाजल्यानंतर दररोज तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर / आवागमन.
स्तर ४ साठी पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर कोणतेही आवागमन किंवा हालचालीवर पूर्णता बंदी. फक्त आवश्यक आणि आपत्कालीन कारणांसाठी मुभा
पाचव्या स्तरात फक्त आपत्काल आणि आवश्यक कारणांसाठी ये-जा करण्याची परवानगी
विविध आर्थिक /सामाजिक कार्यक्रमांसाठी विभिन्न स्तरांवर लागू असणारे निर्बंध खालील प्रमाणे असतील:-
अनु क्र |
स्तर/ कार्य |
स्तर १ |
स्तर २ |
स्तर ३ |
स्तर ४ |
स्तर ५ |
१ |
आवश्यक वस्तूंच्या दुकान/ आस्थापना यांच्या साठी वेळ |
नियमित |
नियमित |
रोज ४:०० वाजे पर्यंत |
रोज ४:०० वाजे पर्यंत |
आठवडाभर ४:०० वाजे पर्यंत व आठवड्याच्या शेवटी बंद. फक्त वैदकीय सेवा चालू |
२ |
आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या दुकान/ अस्थापना यांच्या साठी वेळ |
नियमित |
नियमित |
आठवडाभर ४:०० वाजे पर्यंत |
बंद |
बंद |
३ |
मॉल/ चित्रपटगृह (एकल स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स) /नाट्यगृह |
नियमित |
क्षमतेच्या ५० टक्के |
बंद |
बंद |
बंद |
४ |
उपहारगृह |
नियमित |
क्षमतेच्या ५० टक्के |
क्षमतेच्या ५० टक्के/ आठवडयाच्या दिवसी. जेवणासाठी ४:०० वाजे पर्यंत. त्यानंतर फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी |
केवळ पार्सल/ होम डिलिव्हरी |
होम डिलिव्हरी / अभ्यागतांना परवानगी नाही |
५ |
लोकल ट्रेन |
नियमित/ मापदंडांवर आधारित परंतूर स्थानिक डी एम ए स्तराच्या आधारे निर्बंध लागू करू शकतात |
वैदकीय व आवश्यक सेवांसाठी चालू. स्थानिक डी एम ए महिलांसाठी ही चालू ठेवू शकतात. निर्बंध लागू करू शकतात |
वैदकीय, आवश्यक, महिला,यांच्या साठी चालू. डी एम ए अतिरिक्त निर्बंध लागू करू शकतात |
केवळ वैद्यकीय व काही आवश्यक गोष्टींसाठी |
फक्त वैद्यकीय क्षेत्रासाठी |
६ |
सार्वजनिक ठिकाण,पटांगण, वॉकिंग, सायकलिंग |
नियमित |
नियमित |
रोज सकाळी ५:०० ते ९:०० वाजेपर्यंत |
आठवड्याच्या दिवसी सकाळी ५:०० ते ९:०० वाजेपर्यंत. शनिवार रविवार बंद |
बंद |
७ |
खाजगी कार्यालय उघडण्याबाबत |
सर्व |
सर्व |
सर्व .केवळ आठवड्याच्या दिवसी संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत. अपवादात्मक श्रेणी वगळून |
अपवादात्मक श्रेणी |
बंद |
८ |
कार्यालयात उपस्थिती शासकीय कार्यालय सहित (खासगी- जर मुभा असेल) |
१०० टक्के |
१०० टक्के |
५० टक्के |
२५ टक्के |
१५ टक्के |
९ |
क्रीडा |
नियमित |
इनडोर साठी सकाळी वा संध्याकाळी ५:०० ते ९:००. ऑउट डोर पूर्ण दिवस |
ऑउट डोर सकाळी ५:०० ते ९:०० संध्याकाळी ६:०० ते ९:००. |
रोज सकाळी ५:०० ते ९:००. शनिवारी रविवारी बंद |
बंद |
१० |
नेमबाजी |
नियमित |
नियमित |
(बबल) संध्याकाळी ५:०० नंतर मुभा नाही |
बबल. गर्दी टाळावी/ रोज संध्याकाळी ५:०० नंतर मुभा नाही तर शनिवारी, रविवारी हालचाली/ आवागमन करण्यास मनाई |
बंद |
११ |
लोकांची उपस्थिती (सामाजिक/सांस्कृतिक/ मनोरंजन) |
नियमित |
क्षमतेच्या ५० टक्के |
क्षमतेच्या ५० टक्के फक्त आठवड्याच्या दिवसी. शनिवारी, रविवारी मनाई |
बंद |
बंद |
१२ |
लग्न समारंभ |
नियमित |
दालनाच्या ५० टक्के क्षमेते पेक्षा जास्त नाही. कमाल १०० लोक. |
५० लोक |
२५ लोक |
केवळ कुटुंब |
१३ |
अंत्यसंस्कार |
नियमित |
नियमित |
२० जन |
२० जन |
२० जन |
१४ |
बैठका/ निवडणुका/ स्थानिक प्रशासन स्थायी समिती बैठक. सहकारी मंडळ. |
नियमित |
क्षमतेच्या ५० टक्के |
क्षमतेच्या ५० टक्के |
क्षमतेच्या ५० टक्के |
फक्त ओंन लाईन |
१५ |
बांधकाम |
नियमित |
नियमित |
फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर/ किंवा मजुरांना ४:०० वाजेपर्यंत मुभा |
फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर |
फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर/ फक्त आवश्यक बांधकाम |
१६ |
कृषी |
नियमित |
नियमित |
दररोज ४:०० वाजेपर्यंत |
आठवड्याच्या दिवशी ४:०० वाजेपर्यंत |
आठवड्याच्या दिवशी ४:०० वाजेपर्यंत |
१७ |
ई कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा |
नियमित |
नियमित |
नियमित |
केवळ आवश्यक |
केवळ आवश्यक |
१८ |
जमाव बंदी/ संचारबंदी |
नाही |
जमावबंदी |
संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत जमाव बंदी. ५:०० नंतर संचारबंदी |
संचार बंदी |
संचार बंदी |
१९ |
जिम, सलून,सौंदर्य केंद्र, स्पा/ वेलनेस केंद्र |
नियमित |
आगाऊ परवानगी/ क्षमतेच्या ५० टक्के |
संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत, क्षमतेच्या ५० टक्के. आगाऊ परवानगीसह, एसी ची परवानगी नाही. |
संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत, क्षमतेच्या ५० टक्के. आगाऊ परवानगीसह, एसी ची परवानगी नाही.केवळ लास घेतलेले उपभोगता. |
बंद |
२० |
सार्वजनिक वाहतूक |
नियमित |
१०० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. |
१०० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. |
५० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. |
५० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही |
२१ |
माल वाहतूक,( कमाल तीन व्यक्ती/ चालक/ क्लीनर/सहायक व इतर.)यात्रीसाठीच्या सर्व अटी लागु असतील. |
नियमित |
नियमित |
नियमित |
नियमित |
ई पास सह |
२२ |
अंतर जिल्हा प्रवास/खाजगी कार/टेक्सी/बस/ लांब पल्ल्याच्या रेलगाड्या |
नियमित- जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे. |
नियमित- जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे. |
नियमित -जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे. |
नियमित जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे. |
ये जा करण्यासाठी ई पास आवश्यक. केवळ वैदकीय आपत्काल किंवा आवश्यक सेवे साठी. |
२३ |
उत्पादन. निर्यात करणाऱ्या कंपन्या ज्यांना माल निर्यात करायचा आहे. |
नियमित |
नियमित |
नियमित |
५० टक्के कर्मचाऱ्यांसह. वाहतूक बबल मध्ये ये-जा करावी |
५० टक्के कार्माच्यांसह. विलगीकरण बबल मध्ये |
२४ |
उत्पादन१-आवश्यक उत्पादन कंपन्या (आवश्यक माल/कच्चा माल/ आवश्यक मालासाठी पाकेजिंग उत्पादन)२-निरंतन उप्तादन करणाऱ्या कंपन्या.(ज्या उत्पादनगृहात उत्पादन लगेच थांबवणे शक्य नाही.३-राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण साठी आवश्यक उत्पादने.४-डाटा केद्र/क्लौड सेवा प्रदाते/आय टी सेवा |
नियमित |
नियमित |
नियमित |
५० टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा. |
कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा. |
२५ |
उत्पादन : अश्या सर्व उत्पादन केंद्र की ज्यांचा आवश्यक, निरंतर किंवा निर्यात उत्पादनात समावेश नाही. |
नियमित |
नियमित |
५० टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा. |
५० टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा. |
५० टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक विल्गीकाराना मध्ये ये-जा. |