नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाची गंभीर दखल हवाई वाहतूक संचालनालयाने (DGCA) घेतली आहे. त्यामुळेच प्रवाशांसाठी एक आदेश काझण्यात आला आहे. त्यानुसार, वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, प्रवाशांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे आणि विमानात मास्क घालणे आवश्यक आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राजधानी दिल्लीची स्थिती सर्वात वाईट आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीत दररोज २ हजारांहून अधिक नवीन बाधित समोर येत आहेत. तर सरासरी ८ ते १० व्यक्तींचा मृत्यू होत आहे. मात्र, मंगळवारी १ हजाराहून कमी नवीन रुग्ण आढळून आले ही दिलासादायक बाब आहे. तरीसुद्धा, आरोग्य विभागाने नागरिकांना कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारनेही कोरोना संसर्गावर चिंता व्यक्त केली आहे.
DGCA नवीन मार्गदर्शक तत्त्वे
राज्यांमध्ये वाढत्या कोरोना बाधितांमुळे DGCA ने प्रवाशांसाठी नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. आता प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. तसेच, विमानात मास्क घालणे आवश्यक असेल. दिल्ली स्टेट हेल्थ बुलेटिनने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार १ ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयातील ३०७ कोविड रुग्णांपैकी ही संख्या ५८८ वर पोहोचली आहे, तर २०५ ऑक्सिजन सपोर्टवर आणि २२ व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. ICU प्रवेश १ ऑगस्ट रोजी ९८ वरून १६ ऑगस्ट पर्यंत २०२ पर्यंत वाढले आहेत.
Covid DGCA New Rule Air Passengers