विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतातील ग्रामीण भागात कोव्हिड-१९ चा उद्रेक सुरुच असताना रॅपिड टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि समर्पित कंटेनमेंट झोन तयार करणे अधिक महत्त्वाचे बनले आहे. संबंधित चाचण्या करण्यासाठी काही शहरांमध्ये आठवड्यापेक्षा जास्त काळ लागत आहे. आर्टपार्क (एआय अँड रोबोटिक्स टेक्नोलॉजी पार्क)ने या आघाडीवर एक्सरेसेतू लाँच करून उपाय शोधून काढला आहे.
आर्टपार्कमधील एआय संशोधकांनी हेल्थटेक स्टार्टअप निरामई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससोबत भागीदारी करत व्हॉट्सअपवर छातीच्या एक्सरेच्या स्पष्टीकरणानुसार भारतभरातील कोव्हिड-१९ रुग्णांवर लवकर उपचारासाठी एक्सरेसेतू हा नवा उपाय विकसित केला आहे. ही संपूर्ण सेवा जलद आणि वापरण्यास सोपी आहे. एक्सरेसेतू कोव्हिड-१९ प्रति ९८.८६% संवेदनशीलतेसह काही सेकंदात छातीच्या एक्स-रेचे विश्लेषण देतो
आर्टपार्कचे संस्थापक आणि सीईओ उमाकांत सोनी म्हणाले, “एक्सरेसेतूने एआयसारख्या वेगवान तंत्रज्ञानाच्या मार्गाने, अगदी किफायतशीर पद्धतीने भारतातील ग्रामीण भागात अत्याधुनिक आरोग्यसेवा तंत्रज्ञान पुरवले आहे. उद्योग आणि शिक्षणाची कास बांधत एक्सरेसेतू हे तंत्रज्ञान आधारीत नूतनाविष्काराद्वारे भारतातील केंद्रस्थानात महत्त्वाची सेवा प्रदान करू शकते. प्रत्यक्ष पीएचसी बांधण्याऐवजी आपण अत्याधुनिक एआय – आधारीत प्रणाली उभी करून मोबाइल डिजिटल पीएचसींना सक्षम करू शकू. यामुळे ग्रामीण भागातही आरोग्यसेवा सहज मिळवता येईल.”
आरोग्य तपासणी करण्यासाठी कोणत्याही डॉक्टरांना एक्सरेसेतू डॉटकॉम संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. ‘ट्राय द फ्री एक्सरेसेतू बेटा’ बटणावर क्लीक करावे लागेल. त्यानंतर संबंधित व्यक्तीला प्लॅटफॉर्मद्वारे दुसऱ्या पेजवर नेले जाईल. तेथे तो किंवा ती व्हॉट्सअॅप आधारीत चॅटबॉटद्वारे वेब किंवा स्मार्टफोन अॅप्लीकेशनद्वारे एंगेज होण्याचा पर्याय निवडू शकेल. किंवा डॉक्टर +९१ ८०४६१६३८३८ या नंबरवर सहज व्हॉट्सअप मॅसेज करून एक्सरेसेतू सर्व्हिस सेवा सुरू करू शकतील. त्यानंतर त्यांना पेशंटच्या एक्स-रेचा फोटो क्लिक करावा लागेल व काही मिनिटात टीपा असलेल्या इमेजसह २ पानांचे ऑटोमेटेड निदान मिळते. कोव्हिड-१९ कमी होण्याची शक्यता वाढवत या अहवालात डॉक्टरांचा त्वरीत मागोवा घेण्यासाठी स्थानिक हीटमॅपदेखील दर्शवला जातो.
व्हॉट्सअपवर पाठवलेल्या लो रिझोल्यूशन छातीच्या एक्सरे प्रतिमांकडूनही कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण ओळखण्यासाठी एक्सरे सेतू तयार करण्यात आले आहे. तसेच रिव्ह्यूसाठी प्रभावित भागाची अर्थपूर्ण भाष्ये आणि डॉक्टरांनी दिलेला लाकलाइज्ड हिटमॅपही असतो. लाँच झाल्यापासून याने आतापर्यंत भारताच्या ग्रामीण भागातून जवळपास १२०० पेक्षा जास्त अहवाल सादर केले आहेत.
कोव्हिड-१९ पेक्षाही वरचढ म्हणजे, या प्लॅटफॉर्मद्वारे फुप्फुसासंबंधित १४ अतिरिक्त आजारांचे निदान करता येते. यात क्षयरोग आणि न्युमोनियासह इतर आजारांचा समावेश आहे. एक्सरेसेतू हा अॅनलॉग आणि डिजिटल एक्सरेसाठी वापरता येतो. तो कमी-रिझोल्युशन इमेजवर कार्यरत असून मोबाइलद्वारे याची इमेज पाठवता येते. एक्सरे सेतूने मागील १० महिन्यांत ग्रामीण भागातील ३०० पेक्षा जास्त डॉक्टरांमध्ये याची यशस्वी चाचणी घेतली आहे.