मुंबई – बॉलीवुड असो हॉलीवुड किंवा टॉलीवूड असो चित्रपट हे क्षेत्र असे आहे की, त्यामध्ये एखादा चित्रपट नशीब घेऊन येतो, असे म्हटले जाते आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला तर तो प्रचंड कमाई करून देतो, अशाच एका चित्रपटाने सध्या सर्व भारतभर धुमाकूळ घातला आहे. टॉम हॉलंड स्टारर ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ निर्माण केला आहे. भारतीय प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे.
पहिल्या 4 दिवसातच या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. तसेच पाचव्या दिवशी प्रेक्षकांची संख्या कमी असली तरी ‘स्पायडर मॅन’ने चित्रपटगृहांवर पकड कायम ठेवली आहे. विशेषतः दक्षिणेकडील भागात हा चित्रपट चमत्कार करत आहे. त्या तुलनेत हिंदी प्रदेशात प्रेक्षकांची संख्या घटली आहे. मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 40 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, ‘स्पायडर मॅन’ने पहिल्या 4 दिवसात 109 कोटींचा व्यवसाय केला. बॉक्स ऑफिस इंडियाच्या वेबसाइटनुसार, सोमवारी या चित्रपटाने सुमारे 14 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे 5 दिवसात 123 कोटींचा व्यवसाय केला आहे.
कोरोना महामारीनंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची संख्या, ‘स्पायडर मॅन’ खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर ठरत आहे. ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला तसेच हा चित्रपट हिट श्रेणीत होता. याशिवाय साऊथच्या चित्रपट क्षेत्रात या वर्षी ‘मास्टर’ आणि ‘वकील साहब’ सारखे चित्रपट आले ज्यांनी चांगली कमाई केली पण त्यांचे कलेक्शन ब्लॉकबस्टर म्हणण्याइतपत नव्हते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. हा चित्रपट अनेक विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे. ‘स्पायडर-मॅन’ 16 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. विशेष म्हणजे इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा एकूण चार भाषांमध्ये तो रिलीज झाला आहे.