विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोना संसर्ग झाल्यानंतर दोन प्रकारच्या चाचण्या करणे आवश्यक असते. एक म्हणजे आरटीपीसीआर चाचणी आणि दुसरी म्हणजे एचआरसीटी चाचणी. पहिली चाचणी ही नाक आणि तोंडातील स्त्राव घेऊन केली जाते. तर, दुसरी चाचणी ही सिटीस्कॅन मशीनद्वारे केली जाते. एचआरसीटी चाचण्यांचा निष्कर्ष येतो मात्र, या चाचणीचा स्कोर नक्की किती असावा, असा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्याबाबत बहुतांश जणांना माहिती नसते. आज आपण या चाचणीचा निष्कर्ष आणि स्कोर याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
जर ० ते ८ स्कोर असेल तर तुम्हाला सौम्य संसर्ग झाला आहे
जर ९ ते १८ स्कोर असेल तर तुम्हाला मध्यम संसर्ग झाला आहे
जर १९ ते २५ स्कोर असेल तर तुम्हाला अति संसर्ग झाला आहे