नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या साथीमुळे एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था ढासळत असताना दुसरीकडे चीनने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीत १८.३ टक्के वाढ नोंदविली आहे. चीनच्या संख्याशास्र विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीने अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांमध्ये वाढ दर्शविली आहे.
गेल्या वर्षात म्हणजे २०२० च्या पहिल्या तिमाहीत कोरोनामुळे चीनमध्ये देशव्यापी लॉकडाऊनमुळे चीनी अर्थव्यवस्था ६.८ टक्क्यांवर आली आहे. पण यंदा मात्र १९९२ पासून प्रथम चीनच्या जीडीपीमधील ही सर्वात मोठी उडी आहे. या वर्षात मार्चमध्ये औद्योगिक उत्पादनात १४.१ टक्के वाढ झाली, तर किरकोळ विक्रीत ३४.२ टक्के वाढ झाली. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना व अन्य कारणामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. परंतु व्यापारात आणीबाणी काळात दिलासा मिळाल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला आहे.










