रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भुजबळ कोविड केअर सेंटरचे खा.शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन

एप्रिल 18, 2021 | 9:23 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210418 WA0013 1

– मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,समता परिषद व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी बेडची व्यवस्था

– कोरोनाच्या संकट काळात भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेले अद्ययावत कोविड सेंटर इतर संस्थांना प्रेरणादायी ठरेल – खासदार शरदचंद्र पवार

– राज्यातील विविध संस्थानी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पुढे यावे – मंत्री छगन भुजबळ*

नाशिक – कोरोनाच्या संकटात संकटग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आधार देणारे वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण असे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे. भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थाना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केला.

नाशिक येथे मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगर पालिका , नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुल,नाशिक येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन स्वरूपात पार पडले. त्यावेळी खा.शरदचंद्र पवार बोलत होते.

IMG 20210418 WA0016 1
यावेळी समीर भुजबळ,पंकज भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक डॉ.प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, मुख्याधिकारी लीना बनसोड, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात,शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले,दिलिप खैरे ,बाळासाहेब कर्डक,आंबदास खैरे, कविता कर्डक, गौरव गोवर्धने, कैलास मुदलियार यांच्यासह डॉक्टर्स, कर्मचारी  पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार शरदचंद्र पवार म्हणाले की, स्वयंसेवी संस्थानी आजवर तयार केलेले कोविड सेंटर विलगिकीरण व्यवस्था म्हणून तयार करण्यात येत होते. मात्र छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता असलेले नावीन्यपूर्ण कोविड सेंटर उभे राहत आहे. या कोविड केअर सेंटरमधून संकटग्रस्त रुग्णांना मदतीसाठी मोठा आधार मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, कोविडचे मोठे संकट देशावर आणि राज्यवार असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्था संघटनाची मदत आवश्यक असून त्यांनी यामध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे. नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करण्यात यावे असे आवाहन करत राज्यातील सहकारी आणि स्वयंसेवी विविध संस्था या नाशिकमधील या कोविड सेंटरची प्रेरणा घेतील अशी अपेक्षा करतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बेडची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगर पालिका , नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुल,नाशिक येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांवरील ताण कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, कोविडचे मोठं संकट आपल्यासमोर उभे राहिले असून राज्यातील उद्योजक, साखर कारखानदार, शैक्षणिक संस्था, समाजसेवी संस्थांनी कोरोनाच्या लढाईत योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी
या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खा. शरदचंद्र पवार यांना दिली. तसेच त्यांचे आभार व्यक्त केले.

IMG 20210418 WA0019
स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उभारलेले आणि ऑक्सिजन बेड्स असलेले हे एकमेव कोविड केअर सेंटर- माजी खासदार समीर भुजबळ

मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्यातून उभारण्यात आले आहे. सामाजिक दायित्वातुन उभारलेले आणि ऑक्सिजन बेड्स असलेले हे एकमेव कोविड केअर सेंटर आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १८० ऑक्सिजन बेडस असलेले नाविन्यपूर्ण कोविड केअर सेंटर नाशिकमध्ये प्रथमच उभे राहत आहे. या कोविड सेंटर मुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळेल असे समीर भुजबळ यांनी सांगितले.

मुबलक ऑक्सिजनची व्यवस्था

सदर कोविड सेंटरमध्ये १८० बेडसाठी ऑक्सिजन लाईनची  स्वतंत्र जोडणी केलेली आहे. या ऑक्सिजन लाईनचे मटेरियल सुरत येथून मागवून रात्रंदिवस काम करून ही ऑक्सिजन लाईन उभारण्यात आली आहे.ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वेपोरायझर बडोदा,गुजरात येथून आणण्यात आले आहे. ऑक्सिजन व्यवस्थेसाठी लागणारे ड्युरा सिलिंडर वेल्लूर,कर्नाटक येथून आणण्यात  आले आहेत तर पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले १ केएल  क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणण्यात आणले आहे. १८० रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे रुग्णांच्या सोयीसाठी दिल्ली येथून ५० एअर कुलर मागवून या ठिकाणी बसविण्यात आलेले आहे.सर्व बेडवर स्वतंत्र ऑक्सिमिटर आहे.

तज्ञ डॉक्टर, परिचारिका, स्टाफ असणार कार्यरत

सदर कोविड केअर सेंटरसाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून सर्जन डॉ.अभिनंदन जाधव यांच्यासह ६ एमबीबीएस व ४ बीएचएमएस असे ११ डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी एक अॅडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, १५ वार्ड बॉय, १० सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर तसेच  नाशिक मधील नामांकित फिजिशियन डॉ.शितल गुप्ता आणि डॉ.अतुल वडगांवकर यांचेही सहकार्य लाभणार आहे. रुग्णांना ने-आण करण्यासाठी किंवा संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मिळणार या सुविधा…

या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक  जेवण, अंडी आणि  नाश्ता,फळांचा रस,चहा, रात्रीचे हळदयुक्त दुध,शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. त्याचसोबत रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ,कॅरम इ.खेळ,कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यांसह करमणुकीसाठी ३ मोठे स्क्रीन तसेच दोन दूरदर्शन संच आणि चार मोबाईल चार्जर युनिट यांसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मोठ्या स्क्रीनवर सकाळी योगा व प्राणायामचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट,सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आयपीएल क्रिकेटच्या मॅचेस दाखविण्यात येणार आहेत.जेणेकरून रुग्णांचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होईल.तसेच आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत होणार आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे.येथील काही ७० टक्के बेड पुरुषांसाठी तर ३० टक्के बेड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

IMG 20210418 WA0023

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

“राहुल यांनी दाखविला शहाणपणा, भाजप नेते कधी दाखविणार?” सोशल मिडियातून सवाल

Next Post

नाशिक – ऑनलाईन फुड डिलिव्हरीचा बहाणा, हॅाटेल मालकास सव्वादोन लाखांचा गंडा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
cyber crime

नाशिक - ऑनलाईन फुड डिलिव्हरीचा बहाणा, हॅाटेल मालकास सव्वादोन लाखांचा गंडा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011