पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची संकल्पना
ओझर: नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालाजवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सत्तर बेडचे कोविड केअर सेंटरचे उदघाटन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालय समोर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करून त्याचे कोविड सेंटर मध्ये रूपांतर करण्याची संकल्पना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आखली होती. त्याला जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे केला.दिघावकर यांनी उदघाटन केल्या नंतर त्या स्थळी पाहणी केली.यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.