शुक्रवार, नोव्हेंबर 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अहमदनगर- अकोल्यात शिक्षकांनी उभारले ६० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोविड सेंटर

मे 1, 2021 | 10:37 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


कोरोनावर मात : वर्गणीतून जमवला साडेसतरा लाख रुपयांचा निधी…
अहमदनगर- नगर जिल्हयातील अकोले तालुका शिक्षक समन्वय समितीच्या सहकार्याने उभारलेले ६० बेडचे ऑक्सिजन कोविड सेंटर महाराष्ट्र दिनी रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे. दुर्गम भाग आणि आदिवासी तालुका अशी अकोल्याची राज्यात ओळख आहे. आता या कोरोना महामारीने अनेक कुटुंबांना विषाणूने विळखा घातला. अनेक लोक बाधित झाले. पेशंट आणि नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले. अकोल्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. तसेच उपलब्ध बेड पेशंट संख्येच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहेत. म्हणजे पेशंट ८०० असतील तर एकूण बेड अवघे ७० होते. अशा परिस्थितीत संगमनेर आणि नाशिकला बेड मिळत नव्हते. आजही हा त्रास सुरू आहे. हे हृदयद्रावक चित्र बघून अस्वस्थ झालेल्या अकोल्यात संवेदनशील मनाच्या प्राथमिक शिक्षकांनी निधी जमवायला पुढाकार घेतला. दोन तीन दिवसांत दोन अडीच लाख रुपये निधी उभा राहिला. या कामाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल असे  कोणाला वाटले ध्यानीमनी नव्हते. आधी माध्यमिक शिक्षक आणि नंतर महाविद्यालयातले प्राध्यापक सोबत आले आहेत, आणखी येत आहेत.  आणखी दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. आता कोविड सेंटर उभारायचे कामदेखील पूर्ण झाले आहे.
        एकीकडे मदतनिधी उभा केला जात असताना सातत्याने वाढ होत आहे. ६० ऑक्सिजन बेडसाठी अवघ्या तीन दिवसांत सगळं पाईपिंग पूर्ण झालं आहे. त्यासाठी साहित्य उपलब्ध होणे कठीण असताना मोजक्या शिक्षकांनी जीव धोक्यात घालून ते मिळवले. रस्त्यावर उभ्या उभ्या चार पाच लाख पेमेंट केले. उद्योजक मित्र नितीन गोडसे यांनी पुढाकार घेत सहकार्य केले. काही शिक्षकांनी अत्यंत मेहनत घेतल्यामुळेच बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या. सलाईन स्टँडपासून मास्क, सॅनीटायझर सगळं सर्जिकल साहित्य शिक्षकांनी स्वतः नाशिकला जाऊन आणले.
        सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शिक्षक तिकडे सेंटरला थांबून असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ‘एक नाम केशव‘ असा मंत्र जणू सेंटर उभारण्यासाठी सरसावलेले कार्यकर्ते शिक्षक जपत आहेत. तोदेखील सध्याच्या गंभीर परिस्थितीत.  सामान उतरावयाला हमाल काही मिळेना तेव्हा गाडीमधून खाटा आणि गाद्या शिक्षकांनी उतरवल्या. तेथे उपस्थित काही पत्रकार मित्र देखील मदतीला धावून आले.
      सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन मिळणे कठीण आहे. तो मिळवण्यासाठी शिक्षकांनी काही मंत्री, आमदार, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची आवश्यक तेथे मदत घेतली. सुगाव खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा सगळा सेटअप रेडी झाला की आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पुढील काम बघत आहेत. प्राथमिक शिक्षकांनी नऊ लाख ७० हजार रुपये निधी  अखेर जमवला. माध्यमिक शिक्षक संघटनेने यात सहभागी होत साडेसात लाख रुपये निधी जमवला. महाविद्यालयातील शिक्षक यात सहभागी झाले आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इगतपुरी – लग्नपत्रिका वाटायला गेलेल्या नवरदेवाचा मृतदेह आढळला, खूनाचा संशय

Next Post

पिंपळगाव बसवंत: पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या  ३२ नागरिकांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट 

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20210430 134301 scaled e1619865931798

पिंपळगाव बसवंत: पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या  ३२ नागरिकांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट 

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011