विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
बंगालमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे राज्य सरकारने १६ मे ते ३० मेपर्यंत दोन आठवड्यांसाठी पूर्ण लॉकडाउन लावण्याची घोषणा शनिवारी केली. मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुसरीकडे झारखंडमध्ये रविवार (१६ मे) पासून कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमध्ये लॉकडाउनचा पुढील टप्पा रविवारपासून लागू झाला आहे. दरम्यान, दिल्लीत पुढील सोमवारपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्लीत चौथ्यांदा मुदतवाढ
राजधानी नवी दिल्लीत लॉकडाऊनला चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री केजरावील यांनी कोरोना स्थितीचा आढावा बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय जाहिर केला. यापूर्वी तिनदा लॉकडाऊन वाढविण्यात आला. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी आठवडाभरासाठी लॉकडाऊन वाढविण्याच येत असल्याचे केजरीवाल म्हणाले.
https://twitter.com/ANI/status/1393820995136286726?s=03
बंगालमध्ये आजपासून पूर्ण लॉकडाउन
बंगालच्या मुख्य सचिवांनी सांगितले, रविवारी सकाळी ६ वाजेपासून ते ३० मे च्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण लॉकडाउन लावण्यात आला आहे. यादरम्यान सर्व सरकारी व खासगी कार्यालय, शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स, चित्रपटगृहे, जिम, रेस्टॉरंट, बार, पब, ब्यूटि पार्लर, क्रीडा संकुल आदी पूर्णपणे बंद राहतील.
शाळा-महाविद्यालये आधीपासूनच बंद आहेत. खासगी वाहने, टॅक्सी, बस, फेरी सेवा, मेट्रो, उपनगरीय लोकल सेवा बंद राहील. कारखाने, कंपन्या बंद राहतील. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. दूध, पाणी, मेडिकल, वीज, अग्निशमन आणि माध्यमांची कार्यालये सुरू असतील. होम डिलिव्हरीसुद्धा सुरू राहील. सर्व बँका सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील.
झारखंडमध्ये ई-पास बंधनकारक