विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना विषाणूचा विद्ध्वंस सुरूच आहे. याचदरम्यान कोरोनाच्या तिसर्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये लहान मुले सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या परिस्थितीवरून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. २ ते १८ वर्षे वयाच्या लोकांसाठी भारत बायोटेकच्या कोविड लशीच्या दुसर्या-तिसर्या टप्प्यासाठी परीक्षण करण्याची शिफारस एका तज्ज्ञांच्या समितीने केली होती. त्याला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्यासाठी क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात यावी, अशी शिफारस कोरोनाशी संबंधित सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (एसईसी) मंगळवारी शिफारस केली. २ ते १० वयोगटातील मुलांवर हे परीक्षण करावे. हे परीक्षण दिल्ली, पाटणा येथील एम्समध्ये तसेच नागपूरमधील मेडिट्रिना वैद्यकीय विज्ञान संस्थेत केले जाणार आहे.
कंपनीने मागितली होती परवानगी
भारत बायोटेकतर्फे कोव्हॅक्सिन लशीच्या २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासह इतर गोष्टींचे आकलन करण्यासाठी परीक्षणाच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्याला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) कोविडविषयक तज्ज्ञांच्या समितीने मंगळवारी भारत बायोटेकच्या मागणीवर विचार करण्यात आला. कंपनीच्या मागणीवर सविस्तर चर्चा करून समितीने प्रस्तावित दुसर्या आणि तिसर्या टप्प्याच्या परीक्षणाला परवानगी देण्याची शिफरस करण्यात आली होती.
भारतात आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन लशींचा १८ वर्षांवरील लोकांवरच क्लिनिकल ट्रायल करण्यात आला होता. सध्या लसीकरणे सुरू आहे. परंतु आगामी कोरोनाच्या तिसर्या लाटेचा परिणाम मुलांवर होणार असल्याची शक्यता गृहित धरून लहान मुलांवर परीक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.