इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लस आता खुल्या बाजारात मिळणार आहेत. औषध नियामकाने त्यास मान्यता दिली आहे. याची किंमत प्रति डोस २७५ रुपये आणि आणि १५० रुपये अतिरिक्त सेवा शुल्क असे एकूण ४२५ रुपये असणार आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने या लस किफायतशीर किंमतीत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले होते.
आतापर्यंत, खाजगी रुग्णालयांमध्ये कोवॅक्सिनची किंमत प्रति डोस १२०० रुपये आणि कोविशील्डची किंमत प्रति डोस ७८० रुपये आहे. या किमतींमध्ये १५० रुपये सेवा शुल्क समाविष्ट आहे. या दोन्ही लसी केवळ देशात आपत्कालीन वापरासाठी अधिकृत आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या COVID-19 वरील विषय तज्ञ समितीने, १९ जानेवारी रोजी, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या काही अटींसह प्रौढांसाठी नियमितपणे विक्री करण्यास मान्यता देण्याची शिफारस केली होती.
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ला लसी स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करण्यास सांगितले. लसीची किंमत प्रति डोस २७५ रुपये आणि १५० रुपये, तीही अतिरिक्त सेवा शुल्कासह उपलब्ध करून दिली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक (सरकारी आणि नियामक व्यवहार) प्रकाश कुमार सिंग यांनी २५ ऑक्टोबर रोजी भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांना कोविशील्ड लस नियमित बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी मंजूरी मागणारा अर्ज सादर केला होता.
काही आठवड्यांपूर्वी भारत बायोटेकचे पूर्णवेळ संचालक व्ही. कृष्ण मोहन यांनी प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह, रासायनिक, उत्पादन आणि उत्पादनात कोवॅक्सिनला नियमित बाजारात आणण्याचा प्रयत्न केला. याविषयी आवश्यक संपूर्ण माहिती सादर केली होती. गेल्या वर्षी ३ जानेवारी रोजी, कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या अँटी-कोविड-१९ लसींना देशात आणीबाणीच्या वापरासाठी (इमर्जन्सी युज ऑथोरायझेशन, EUA) मान्यता देण्यात आली होती.