विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशात कोरोनावर मात करण्यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षापासून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेषतः मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे याबरोबरच मोठ्या प्रमाणावर लशीकरण करणे यासारख्या प्रभावी उपाय योजनांचा यात समावेश आहे. प्रत्येक नागरिकाला लशींची दोन डोस मिळावेत, यासाठी भारतात केंद्र सरकार तसेच विविध राज्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी स्फुटनिक, को शिल्ड कोव्हॅक्सीन आदि लशींचे डोस देण्यात येत आहेत. परंतु काही ठिकाणी अद्यापही लशींचा पुरेसा साठा नसल्याने काही लोकांना एकच डोस मिळाला आहे. परंतु आता ज्यांना एकच डोस मिळाला आहे, त्यांना देखील चिंता करण्याचे कारण नाही. कारण कोव्हॅक्सीनचा एक डोस देखील कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी ठरणार आहे, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सध्या देशात कोविड १९ ची दुसरी लाट अद्याप सुरुच असून सप्टेंबर-ऑक्टोबर महिना खूप महत्त्वाचा असल्याचे अलीकडेच केंद्रीय आरोग्य विभागाने नागरिकांना सूचित केले होते. जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहेत. देशात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असतानाच केरळमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. यात आयसीएमआरचा एक महत्त्वपूर्ण रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार कोरोना संक्रमित होणाऱ्या लोकांमध्ये भारत बायोटेकची कोरोना लस कोव्हॅक्सिनचा सिंगल डोसही अँन्टिबॉडी वाढवण्यासाठी प्रभावी ठरत आहे.
आयसीएमआरने इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये नमुद केले आहे की, कोविड संक्रमण झाले नाही आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांपेक्षा तुलनेत एकच डोस घेतलेल्यामध्ये हे प्रमाण सिद्ध झाले आहे. तसेच मोठ्या लोकसंख्येत प्रारंभित स्वरुपात निष्कर्षाला मान्यता दिली केली गेली, त्यामुळे यापुढे लोकांना लसीचा एक डोस दिला जाऊ शकतो. त्यामुळे लसीच्या मर्यादित पुरवठ्यात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केले जाऊ शकते.