भोपाळ (मध्य प्रदेश) – असे म्हणतात की भारतात बहुतांश कायदे हे स्त्रीयांच्या बाजूने आहेत. पुरुषांच्या बाजूने कायदेच नाहीत. त्यामुळेच पुरुषांच्या विरोधात निकाल लागतो, असेही बोलले जाते. मात्र, भारतीय न्यायव्यवस्थेलर विश्वास ठेऊन अनेक जण वर्षानुवर्षे न्यायालयात जात असतात. निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये या तत्वावर आधारीत भारतीय न्यायव्यवस्था आहे. असाच एक मोठा निकाल समोर आला आहे.
वरिष्ठ सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 वर्षीय महिला आणि तिच्या 29 वर्षीय जावयाला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कारण या महिलेने तिच्या सुनेसह शेजाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा खोटा आरोप केला. खोटे पुरावेही दाखवले. अशोक नगर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा अभियोक्ता मोहम्मद आझम यांनी सांगितले की, महिला आणि तिचा जावई यांच्यात अनैतिक संबंध होते. 2014 मध्ये या दोघांनी आपल्या शेजाऱ्यांना गोवण्याचा कट रचला. शेजाऱ्यांना त्यांच्या अफेअरची माहिती मिळाल्याने तिने हे कारस्थान रचले. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या चार शेजाऱ्यांनी तपासादरम्यान आपल्यावर खोटा आरोप केल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. डीएनए चाचणीदरम्यान महिलेच्या कपड्यांवर सापडलेला सीमेन्स तिचा जावई गोपाल रजक याचे असल्याचे आढळून आले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश कुमार चौहान यांनी महिला गुड्डी ओझा आणि तिचा जावई गोपाल रजक यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या महिलेच्या पतीचा 2011 मध्ये मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऑगस्ट 2014 मध्ये तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या चार लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. महिलेच्या वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपासादरम्यान सर्व आरोपी आपण निर्दोष असल्याचे सतत सांगत होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी डीएनए चाचणी केली. या चौघांपैकी कोणीही महिलेवर बलात्कार केला नसल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान गोपाल रजक याने पोलिसांकडे केलेल्या चौकशीत सासूशी अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले आणि शेजाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले.