इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑस्ट्रेलियातील एका न्यायालयाने एका पित्याला त्याच्या विचित्र सवयीमुळे त्याच्याच मुलाला भेटण्यास मनाई केली आहे. त्या व्यक्तीच्या माजी पत्नीच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला की, तो पिता आपल्या मुलाला भेटू शकत नाही. कारण त्या माणसाला प्रौढ व्यक्तीचे डायपर घालण्याची सवय होती, ती त्याच्या माजी पत्नीला कळली.
महिलेने न्यायालयाला सांगितले की, यासंदर्भात जेव्हा परिस्थिती तिच्या नियंत्रणाबाहेर गेली, तेव्हा तिने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. ही व्यक्ती डायपर घालून घरभर फिरत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच महिलेच्या म्हणण्यानुसार, असे अनेकवेळा घडले जेव्हा ती व्यक्ती आपल्या मुलाला घेण्यासाठी पोहोचली तेव्हा त्याचा डायपर स्पष्ट दिसत होता. यानंतर महिलेने आपल्या माजी पतीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले.
2021 मध्ये कोर्टाने त्या व्यक्तीला आपल्या मुलाला भेटण्यास बंदी घातली होती. न्यायालयाच्या या निर्णयाला त्या व्यक्तीने वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले होते. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे मानून सर्वोच्च न्यायालयाने त्या व्यक्तीची याचिका फेटाळून लावली आहे. याचिकेत त्या व्यक्तीने म्हटले होते की, डायपर घातल्याने बाळाला कोणताही धोका नाही.
कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायमूर्ती हिलरी हॅनन यांनी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सांगितले की, मी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार केला आहे आणि मी या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की, वडिलांना डायपर घालण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. त्याच्या अशा वागण्याने सामाजिक प्रश्न निर्माण होतात.
त्याचवेळी, वडिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, ते नेहमीच अल्पसंख्याक ओळख असलेल्या नागरिकांचा आदर करतात. त्यांच्या वेगवेगळ्या सवयींमुळे समाजात वेगळी वागणूक दिली जाते. प्रौढ डायपर प्रेमी समुदायाशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे त्यांना वेगळे केले जात आहे ,असे त्यांना वाटते.