नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कट मारल्याच्या कारणातून बस अडवून चालकास मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ललीत जनार्दन गावंडे (३८ रा.दत्तमंदिराजवळ राजीव टाऊनशिप,इंदिरानगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२५ फेब्रुवारी २०१२ ही घटना औरंगाबादरोडवरील माडसांगवी टोलनाका भागात घडली होती. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास हवालदार एस.पी. कडाळे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.०९ चे न्या. एम.ए.शिंदे यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड.आर.वाय.सुर्यवंशी आणि आर.एम.बघडाणे यांनी पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार,पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये दोषी ठरवून भादवी कलम ३३२ मध्ये त्यास एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा
या कारणातून झाली मारहाण
या मारहाण प्रकरणी शांताराम शिवराम महाले (रा.देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली होती. महाले एस.टी.महामंडळात बसचालक पदावर कार्यरत असून ते २५ फेब्रुवारी २०१२ रोजी सेवा बजावत असतांना ही घटना घडली होती. प्रवाश्यांना बसवून ते बस घेवून निफाडच्या दिशेने जात असतांना आय २० कारमधून आलेल्या आरोपीने माडसांगवी टोलनाका भागात एस.टी अडवून कारला कट का मारला ? या घटनेत आरोपीने शिवीगाळ करत बसचालक महाले यांना वाहनातून खाली ओढून लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.