नाशिक : महिलेच्या गळयातील सोनसाखळी ओरबाडणा-या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष साध्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे, सरफराज अली उर्फ जाफरी फिरोज बेग (२९ रा. मुळ रा.अजमेर, राजस्थान हल्ली आंबिवली कल्याण) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट ७ च्या न्या. प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड. एस.जे.बागडे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून दुचाकीवर पाठीमागे बसून सोनसाखळी खेचणा-या बेग यास दोषी ठरवित त्यास दोन वर्ष साधा कारावास आणि शंभर रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०१९ मध्ये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत हिरावाडीतील सुरेखा उपासणी (रा.भक्तीनगर) या वृध्दा सकाळी शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातील कमलाकर चौकातील ओम हेअर दुकानासमोरून त्या पायी जात असतांना काळय़ा दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे २० हजार रूपये किमतीचे सोनसाखळी आणि मंगळसूत्र ओरबाडून नेले होते. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस.बी.चोपडे यांनी सरफराज बेग सह अंकित कमलकिशोर मल्होत्रा (३० रा.सिध्दीपुरा ब-हाणपूर,मध्यप्रदेश) या दोघांना अटक करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.