नाशिक – सातपुर येथील राहुल भास्कर शेजवळ खून प्रकरणात पाच आरोपींना न्यायालाने जन्मठेपेची शिक्षा सुनावणी असून ४० हजार रुपये दंड ठोठावला आहे . ७ डिसेंबर २०११ ला त्र्यंबक रोडवरील हॅाटेल सोनाली गार्डन समोर येथे पाच जणांनी शेजवळ यांना ठार मारले होते. सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय येथे सुरु होती. या आरोपींना आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघवसे यांनी ही शिक्षा सुनावणी.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल शेजवळ व त्याचे मित्र हॅाटेल सोनाली गार्डन मध्ये पार्टीसाठी गेले होते. हॅाटेलमधून बाहेर आल्यानंतर राकेश मधुकर जाधव, शरद नगारे, अनिरुध्द शिंदे, लक्ष्मण गुबाडे व दिपक भास्कर यांनी यांनी धक्का लागल्याने कुरापत काढून राहुलला डोक्यात लोखंडी गजाने व चाकु सारख्या हत्याराने वार करुन ठार मारले व त्याच्या मित्राला गंभीर दुखापत केली. या आऱोपींविरुध्द सातपुर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक के.आर. पोपेरे यांनी केला. त्यांनी आरोपीविरुध्द सबळ पुरावे सादर केले. तर सरकारी पक्षातर्फे अॅड. शिरीष कडवे यांनी कामकाज बघितले. तर पोलीस हवालदार डी.एस. काकड, एस. यु. गोसावी यानी पाठपुरावा केला. या खटल्याल न्यायालयाने या आरोपींना शिक्षा सुनावली आहे…