नाशिक – चौदा वर्षापासून पत्नीने त्याग केल्यामुळे येथील दिवाणी न्यायालयाने अखेर पतीला फारकत मंजूर केली. विवाह संबधातून दोन मुली झाल्या तरीही तिने पतीकडे नांदण्यास नकार दिला. न्यायाधिश एस.डी. इंदालकर यांनी पतीच्या बाजूने महत्वपूर्ण निर्णय दिला. या दोघांचा विवाह २००५ मध्ये झाला होता. विवाहनंतर तीन महिन्यात पती दुबईला नोकरीसाठी गेला. दरम्यान पत्नीने दोन जुळ्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर पत्नीने पिंपळगाव न्यायालयात केलेल्या अर्जात तीला दरमहा रक्कम देण्याचा आदेश केला होता. पतीने २०१८ ला नाशिक येथील न्यायालयात फारकत मिळण्यासाठी अर्ज केला. त्यांच्यातर्फे अॅड. धर्मेंन्द्र चव्हाण यांनी बाजू मांडली. पती, पत्नी चौदा वर्षापासून वेगळे राहत नसल्याने एकत्र येवू शकत नाही असा निष्कर्ष न्या. इंदालकर यांनी काढत पतीचा फारकतीचा अर्ज मंजूर केला.