नाशिक : चारित्र्यांच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या करणा-या तीस जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१ चे न्या. व्ही.एस.कुलकर्णी याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आण्णासाहेब निवृत्ती गायके (५५ रा.अपर्ना कॉलनी,शिवराम नगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत ज्योती गायके (५०) या विवाहीतेची हत्या करण्यात आली होती. गायके दांम्पत्यात चारित्र्याच्या संशयातून नेहमी वाद होत होते. १० जानेवारी २०१८ रोजी ज्योती गायके या आपल्या घरात किचनमध्ये घरकाम करीत असतांना पती पत्नीत पुन्हा वाद झाले. यावेळी आरोपीने किचनमध्ये पडलेल्या लोखंडी मुसळी आपल्या पत्नीच्या डोक्यात घालून निर्घृण हत्या केली होती. यावेळी मुलहा अजिंक्य आणि त्याच्या बहिणीने आई वडिलांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही लोखंडी मुसळीने मारहाण करीत जखमी केले होते. याप्रकरणी अजिंक्य गायके याच्या तक्रारीवरून वडिल आण्णासाहेब गायके याच्या विरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात खून आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी या गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१ चे न्या. व्ही.एस.कुलकर्णी यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,पंच आणि साक्षीदार यांनी दिलेली साक्ष व परिस्थीतीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपीस खूनाच्या आरोपात जन्मठेप आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा वर्ष सश्रम कारावास असेही आपल्या निकालात नमुद केले आहे.