नाशिक – शारिरीक व मानसिक छळ करून पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस दहा वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. या प्रकरणाचा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिला.
स्वप्नील सुरेश बागड (२९, रा. राजरत्न नगर, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. स्वप्नील पत्नीला माहेरून एक लाख रूपये घेऊन ये या कारणावरून वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ करून पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते. १६ मे २०१६ रोजी पत्नीने आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी मुलीचे वडील सातप्पा तेमीनफेरी (६७ रा. नागपसुर ता. अक्कलकोट जि सोलापुर) यांनी फिर्याद दिली. लग्नानंतर स्वप्नील हा त्याच्या इतर नातलगासोबत मिळून मुलीचा पैशांसाठी छळ करत असे, त्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचेही या फिर्यीदीत म्हटले होते. त्यानंतर आरोपी विरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. जी. सहारे यांनी करून न्यायलायात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. आर. एम. कोतवाल यांनी कामकाज पाहिले.