इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – फॅशन म्हणून कोणी कसेही कपडे परिधान करते, परंतु कोणी कसे कपडे परिधान करावे, यावर आपल्या देशात फारसे निर्बंध नाहीत. त्यामुळे काही वेळा काही तरूणी किंवा महिलांनी अपुरे किंवा उत्तन अथवा वेगळ्याच प्रकारचे कपडे परिधान केले तर त्या संदर्भात वारंवार आरोप होतात. तसेच महिलांनी असे कपडे परिधान करू नये याबाबत देखील सांगण्यात येते. मात्र असे बंधन कोणावरही लादता येणार नाही, असे न्यायालयाने यापूर्वीच बजावले आहेत. त्यातच आता केरळ न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
एका महिलेने एका वृद्धावर लैंगिक छळाचा आरोप केला, मात्र न्यायालयाने सदर फिर्यादी महिला चांगलेच फटकारले. तिच्या कपड्यावरून देखील न्यायालयाने टिप्पणी केली आहे. महिलेने परिधान केलेल्या कपड्यांवर सवाल उपस्थित करत न्यायालयाने लैंगिक छळाचा संशयित आरोपी असलेल्या व्यक्तीला दिलासा दिला आहे. या संशयित आरोपीचा जामीन कोर्टाने मंजूर केला आहे. हे प्रकरण केरळच्या कोझिकोड येथील न्यायालयातील असून याप्रकरणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
एका सामाजिक कार्यकर्त्याविरोधात महिलेने आरोप केले होते. लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्याचे वय ७४ वर्ष असून हा व्यक्ती लेखकही आहे. एका कलमाखाली पीडित महिलेने वयोवृद्ध व्यक्तीवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.
पण सकृतदर्शनी पुरव्यांच्या आधारे, महिलेने उत्तेजित करणारे कपडे घातले होते हे निदर्शनास आले आहे. सदर व्यक्तीवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने तक्रारदार महिलेलाच फटकारले आहे. कोझिकोड सत्र न्यायालयात झालेल्या या सुनावणीदरम्यान नोंदवण्यात आलेले मत आता चर्चेत आले आहे.
सिविक चंद्रन हे केरळमधील एक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्याचे वय 74 वर्ष आहे. त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप महिलेनं केला होता. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान, कोझिकोड सत्र न्यायालयाने आरोपीला जामीन तर मंजूर केलाच. शिवाय जे निरीक्षण नोंदवलं तेही फार महत्त्वाचं होतं. कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाने अनेकांचं लक्ष वेधले आहे.
न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणात म्हटले की, आरोपी सिविक चंद्रन यांच्यावतीने सादर करण्यात आलेले पुरावे, फोटो यावरुन असे दिसते की तक्रारदार पीडित महिलेने स्वतः उत्तेजित करणारे कपडे परिधान केलेले होते. त्यामुळे सकृतदर्शनी पुरावे पाहता, आरोपीवर सदर कलम लागू होणार नाही. शिवाय न्यायालयाने ७४ वर्षीय आरोपीच्या वयाबाबतही महत्त्वाचं विधान केले आहे. ७४ वयाची ही व्यक्ती शारिरिक दृष्ट्या कमजोर आहे. ती जबरदस्ती पीडित पहिलेला आपल्या मांडीवर बसवणे, ही निव्वळ अशक्य गोष्ट असून यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे, असे देखील न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करताना म्हटले आहे.
Court Important order about Sexual harassment
Legal Senior Citizen Women Clothes