खूनाच्या प्रकरणात दोघांना सात वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा
नाशिक – खून केल्या प्रकरणी दोघांना सात वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.वाघवसे यांच्या न्यायालयाने सुनावली. आकाश सुरेश पवार (वय २७, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर) तुषार दिनेश लांडे (वय २८, थोरात पार्क निळकंठेश्वर नगर अशोकनगर) अशी आरोपीची नावे आहे. सातपूरला शिवाजीनगर परिसरात फोनवर बोलणाऱ्या एकाला बेदम मारहाण करुन खून केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. २९ जानेवारी २०१८ ला रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. यात बबन सोमा बेंडकुळे (वय २५, गणेशमंदीराजवळ शिवाजीनगर) याचा खून झाला. बबन हा सिध्दी विनायक गार्डनच्या मागील कंपाउडजवळ फोनवर बोलत असतांना दुचाकीवरुन आलेल्या या दोघा संशयितांनी काही कारण नसतांना आकाश पवार याने डोक्यात चापट मारली. त्यानंतर बबन बेंडकुळे याने जाब विचारला असता, तुषार लांडे याने त्याचा हात धरला. त्यानंतर दोघांनी बबनच्या हातावर, पोटावर मांडीवर वार करुन पळ काढला. त्यानंतर गंभीर स्थीतीत बबनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, ११ फेब्रूवारीला त्याचे निधन झाले. गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा तपास उपनिरीक्षक एस.एम.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यांनी करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. त्यानंतर युक्तीवाद होऊन हा निकाल लागला. या खटल्यात दोघा आरोपीना ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड योगेश डी कापसे यांनी तर पैरवी आधिकारी म्हणून पोलीस जी.ए.पिंगळे, कोर्ट अंमलदार एस.यु.गोसावी यांनी कामकाज बघितले.
जमावबंदी आदेश डावलून नमाज पठणावरुन गुन्हे
नाशिक – कोरोना प्रतिबंधात्मक आदेश डावलून बकरी ईद निमित्ताने मशीदीमध्ये सामूहीक नमाज पठण केल्यामुळे भद्रकालीत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. दूधबाजारातील शाही मशीदीत जमावबंदी आदेश डावलून नमाज पठाणाला गर्दी जमविल्याबद्दल गयाउद्दीन अब्दुल कादीर (राबीया मंझील दूधबाजार) यांच्यासह ट्रस्ट्रीवर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र केशव माळी यांच्या फिर्यादीवरुन भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुस-या प्रकरणात अब्दुल शाकुर सैय्यद, (कथडा मस्जीद, नासीरखान रज्जकखान पठाण, कुतुबुउद्दीन दिलावर मुल्ला सादीकनगर यांच्या विरोधात कछडा मस्जीद येथे बुधवारी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचा कोरोना प्रतिबंधात्माक आदेश डावलून एकशे तीस ते चाळीस जणांची गर्दीला नमाज पठणासाठी प्रवेश दिला म्हणून पोलीस हवालदार जयप्रकाश श्रावण शिरोळे यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पंचवटीत मटका अड्यावर छापा
नाशिक – पंचवटीतील पेठ रोड वरील मेघराज बेकरीजवळ वडाच्या झाडाखाली मटका चालत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी पोलीस शिपाई बलदेव शंकर राठोड यांच्या तक्रारीवरुन विजय रामू कराळे (वय ४०) दीपक रामू कराळे (वय ३८ , लक्ष्मणनगर पेठ रोड) यांच्या विरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता.२१) दुपारी साडे तीनला वडाच्या झाडाखाली खुलेआम मेन-वरळी मटक्याचे बुकींग घेत असल्याने संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला