इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – गुजरातमधील गांधीनगर येथील न्यायालयाने आसाराम बापूला २०१३ मध्ये विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीके सोनी यांनी मंगळवार म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणातील शिक्षेची घोषणा मंगळवारी होणार आहे.
आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आसाराम बापूने 2001 ते 2006 या काळात शहराच्या बाहेरील आश्रमात राहणाऱ्या महिलेवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे.
विशेष सरकारी वकील आर.सी. कोडेकर म्हणाले, “न्यायालयाने फिर्यादीची केस ग्राह्य धरली आहे आणि कलम ३७६ २(सी) (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक गुन्हा) आणि इतर तरतुदींनुसार आसारामला दोषी ठरवले आहे.” आसाराम सध्या दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणात जोधपूर तुरुंगात बंद आहे.
ऑक्टोबर 2013 मध्ये सूरतमधील एका महिलेने आसाराम बापू आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेचा गुन्हा दाखल केला होता, ज्यापैकी एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपपत्र जुलै 2014 मध्ये दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने आता आसारामला दोषी ठरविले आहे. याप्रकरणात आसारामला अनेक वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
Court Convicts Asaram Bapu in 2013 Rape Case