इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोळा वर्षापूर्वीच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी करण्यात आले. राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयाचे हे वॅारंट जारी केले आहे.
२००८ मध्ये महामंडळाच्या बसगाडीची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता. चिथावणीखोर भाषण दिले म्हणून ते याप्रकरणातील आठवे आरोपी आहेत.
यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामिन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते. त्यावेळी त्यांना जामीनही दिला होता. मात्र त्यानंतर ताऱखेला हजर राहत नसल्यामुळे पुन्हा एकदा अटक वारंट जारी केले.