नाशिक – लाचप्रकरणात अटक केलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. पण, आता ही सुनावणी सोमवारी होणार असून त्यामुळे त्यांचा सेंटरजेलमधील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. अगोदर झनकर यांना न्यायालयीन कोठडी मिळूनही त्यांचा अतरिम जामिन फेटाळण्यात आल्याने त्यांचा मुक्काम वाढला होता. त्यानंतर आरोपीच्या वतीने नियमीत जामिन अर्ज सादर करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी होती. पण, आता ती सोमवारी होणार आहे.
जिह्यातील एका शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमीत वेतन सुरू करण्याच्या मोबदल्यात आठ लाख रूपयांची लाच स्विकारलेल्या प्रकरणात शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांना ठाणे एसीबी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सलग चार दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर मंगळवारी त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतरही त्यांचा जामीन अर्ज मंजूर झाला नाही. सोमवारच्या सुनावणीत त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.