विशेष प्रतिनिधी, नाशिक
आनंदवल्लीतील रमेश मंडलिक या वृद्धाच्या हत्या प्रकरणातील फरार भूमाफिया आणि रम्मी परमजितसिंग राजपूत व जिम्मी परमजितसिंग राजपूत या दोघांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात रम्मी राजपूतसह २० संशयितांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या भूमाफिया टोळीवर शहर पोलीसांनी मोक्कान्वये कारवाई केली आहे. गुन्हा उघडकीस आल्यापासून रम्मी आणि जिम्मी राजपूत पसार झाले होते. त्यांना पोलिसांनी हिमाचल प्रदेशमधून अटक केली. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात उभे केले असता त्यांना पोलिस कोठडी देण्यात आले. या घटनेत गुन्ह्याचा कट रचणे, रमेश मंडलिक यांची हत्या करणे, त्याचे नियोजन करणे आदी सर्व प्रमुख कारणांमागे राजपूत मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.