नाशिक – जिल्हा न्यायालयाने टिप्पर गँगला मोक्का अंतर्गत शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात तीन आरोपींना १० वर्षे सश्रम कारावास व २५ लाख १७ रुपये दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी या विशेष खटल्याचा निकाल दिला. नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अंबड पोलिस ठाण्यात ३१ मे २०१६ रोजी राजाबाबु वाईन शॅाप रोडवर शुभम पार्क सिडको येथे घडला होता. सदर गुन्ह्याताली फिर्यादी शुभम भावसार हे घरी जात असतांना गुन्ह्यातील आरोपी गणेश सुरेश वाघ उर्फ गण्या कावळ्या, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले, देवदत्त तुळशीराम घाटोळे, मुकेश राजपूत. शाकीर नासीर पठाण, सोन्या उर्फ हेमंत बापू पवार यांनी फिर्यादी, बोलावून त्यांचेकडे हप्त्याची मागणी केली होती. आज सायंकाळपर्यंत पाच लाख आणून दिले नाही तर आई वडीलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. फिर्यीदीने नकार दिल्याने शाकीर पठाण यांनी पिस्टल लावून दम दिला. तर इतर आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्याचप्रमाणे हाताताली लोखंडी रॅाड व तलवारीने वार केले. त्यानंतर पॅन्टच्या खिशातून ७ हजार ३०० रुपये काढून घेतले होते. या घटनेनंतर तत्कालीन एसीपी अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी या गॅगच्या मुसक्या आवळल्या होत्या. या खटल्यात सरकारी वकील एस एस कोतवाल यांनी युक्तीवाद केला.