नाशिक – लाचप्रकरणात अटक केलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांच्या जामीन अर्जावर आता २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जिल्हा रुग्णालयास उपचाराबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. झनकर न्यायालयीन कोठडी मिळूनही त्यांचा अतरिम जामिन फेटाळण्यात आल्याने जिल्हा रूग्णालयातील त्यांचा मुक्काम वाढला होता. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहे. जिह्यातील एका शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमीत वेतन सुरू करण्याच्या मोबदल्यात आठ लाख रूपयांची लाच स्विकारलेल्या प्रकरणात शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांना ठाणे एसीबी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सलग चार दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर मंगळवारी त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपीच्या वतीने नियमीत जामिन अर्ज सादर करण्यात आला. या कामकाजासाठी सरकारपक्षाच्या वतीने एक दिवसांची मुदत मागण्यात आली होती. त्यानंतर आज सुनावणी झाली.