नवी दिल्ली – जगभरातील अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या खऱ्या अर्थाने रहस्यच आहेत. त्यांच्याबाबत फारशी माहिती उघड झालेली नाही. काही शास्त्रज्ञांना याबद्दल माहिती नसते असे नाही, परंतु त्यांना योग्य यश मिळत नाही.
आपण आता भारताच्या एका रहस्यमय तलावाबद्दलची माहिती घेणार आहोत. या तलावाची खोली तज्ज्ञांकडून देखील समजू शकलेली नाही. या रहस्यमय कुंडाचे (तलावाचे) नाव आहे भीम कुंड. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यापासून सुमारे ७० कि.मी. अंतरावर असलेल्या बजना गावात हे कुंड आहे. त्याच्या नावावरूनच याचा संबंध महाभारत काळाशी आहे, हे लक्षात येते.
या भीम कुंडाबद्दल एक गोष्ट प्रचलित आहे की, महाभारत काळात जेव्हा पांडव अज्ञातवासात असताना इकडे-तिकडे भटकत होते, तेव्हा त्यांना फार तहान लागली होती. पण बरीच भटकंती करूनही त्यांना कुठेही पाणी मिळाले नाही. अशा परिस्थितीत भीमाने आपल्या गदेने जमिनीवर प्रहार करून हा तलाव बनविला आणि सर्वांची तहान शांत केली.
याबद्दल असेही म्हटले जाते की, सुमारे ४० बाय ८० मीटरच्या या तलावाचा आकार गदा सारखा आहे. असे म्हणतात की, जेव्हा आशिया खंडात नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर, वादळ, त्सुनामी येते, तेव्हा तलावाचे पाणी आपोआपच वाढते. या रहस्यमय तलावाच्या खोलीसाठी स्थानिक प्रशासन, परदेशी वैज्ञानिक आणि डिस्कवरी चॅनेलद्वारे प्रयत्न केले गेले आहेत. पण एकालाही यश मिळालेले नाही.
एकदा परदेशी वैज्ञानिकांनी टाकीची खोली शोधण्यासाठी २०० मीटर पाण्यापर्यंत कॅमेरा पाठविला होता. परंतु अद्याप खोली शोधू शकली नाही. भीमा कुंडाबद्दल असेही म्हटले जात आहे की, त्याचे पाणी गंगेच्या पाण्याइतके शुद्ध असून ते कधीच दुषित होत नाही. सामान्यपणे अन्य कुंड किंवा स्थिर तलावाचे पाणी हळूहळू खराब होऊ लागते. मात्र, भीम कुंड त्याला अपवाद आहे. भीमा कुंडाची खोली किती आहे आणि जेव्हा जेव्हा महापूर येतो, तेव्हा त्याची पाणी पातळी का वाढते, हे अद्यापही रहस्यच आहे.