नाशिक – नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या पालघरमधील सफाळे येथील टेकरीचा पाडा येथील नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. काही दिवसापूर्वी या बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या बाळावर उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. पालघर टेकरीचा पाडा येथे बाळ जन्माला आल्यानंतर १२ तासातच त्याची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्याच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते. पण, येथे लहान बालकांसाठी कोणतीही आरोग्य सुविधा नसल्यामुळे बालकाला जव्हार येथील पतंग शहा कुटिर रुग्णालयात एनआयसीयू मध्ये उपचारासाठी नेण्यात आले. पण, येथे बाळाची प्रकृती खालावत गेल्यामुळे जव्हार रुग्णालयातून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, या नवजात बालकाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.