नाशिक – कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण मिळविण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, नाशकात कोरोना योद्धेच लसीकडे पाठ फिरवित आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. पोलिस, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यास प्राधान्य दिले असले तरी दुसरा डोस घेण्याकडे मात्र त्यांचा कल नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना योद्धे स्वतःला कोरोनापासून सुरक्षित कसे ठेवतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आकडेवारी अशी
नाशिक महानगरपालिका – कोविड-१९ लसीकरण – १८ एप्रिलपर्यंत
लस — कोवीशिल्ड
प्राप्त डोस- २,०५,८५०
वापर डोस – २०२९०७
शिल्लक डोस – २९४३
१) हेल्थ वर्कर –
पहिला डोस – २२ हजार ८३०
दुसरा डोस – ७ हजार २४९
२) फ्रन्टलाइन वर्कर-
पहिला डोस – ११ हजार २७१
दुसरा डोस – २ हजार ९२८
३) ६० वर्षावरील व्यक्ती –
पहिला डोस – ४१ हजार ७०५
दुसरा डोस – १ हजार १८५
