इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून एका मागून एक लाट येतच आहे, काही देशांमध्ये कोरोनाचा नायनाट झालेला दिसत असला तरी थोड्याफार प्रमाणात अद्याप त्याचा प्रादुर्भाव जाणवतच आहे. मात्र आता काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून जागतिक आरोग्य संघटनेने देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात रुग्णांच्या संख्येने तब्बल 56 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 567,275,561वर पोहोचली आहे. तर 6,387,063 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप जाणवत आहे.
विशेषतः जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला असून देश सध्या सातव्या लाटेशी लढा देत असल्याचे दिसत मिळत आहे. शनिवारी कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांच्या आकडेवारीने विक्रम केला आहे. एका एजन्सीच्या रिपोर्टनुसार, 24 तासांत 1,10,000 नवे संक्रमित आढळले आहेत. कोरोनाच्या सातव्या लाटेचा सामना करत असताना जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी देशातील जनतेला साथीच्या आजाराबाबत जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
महत्वाचे म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरिंएंटमुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे, असे म्हटले असून चिंता व्यक्त केली आहे. आता अनेक देश कोरोनाबाबत दुर्लक्ष करत आहे. जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा फैलाव सुरू झाला आहे. काही महिन्यांपासून नियंत्रणात असलेली परिस्थिती पुन्हा बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होत असून मृतांचा आकडाही वाढत असल्याने WHO ने चिंता व्यक्त होत आहे. बदलत्या आकडेवारीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जारी केला आहे. कोरोनाच्या नव्या लाटेपासून सावध राहा असे आवाहन देखील केले आहे. WHO चे प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, आपल्याला कोरोनाच्या नव्या लाटेसाठी आता सज्ज राहावे लागणार आहे. जे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. त्याचे प्रत्येकाचे स्वरुप बदललेले आहे. जास्त वेगाने संक्रमित होताना दिसत आहेत. जितक्या मोठ्या प्रमाणात संक्रमित रुग्णांची संख्या वाढेल तितके रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढेल. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीला लक्षात घेऊन प्रत्येक देशाने नियोजन करायला हवे.
Corona Virus Seventh Wave in this Country Japan Omicron