इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोविडची बाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी कमीत कमी निम्म्या नागरिकांना दोन वर्षांनंतर म्हणजेच आजपर्यंत एक किंवा एकापेक्षा अधिक कोविडची लक्षणे दिसून येत आहेत. द लँसेट रेस्पिरेटरी मेडिसिन नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनात हा खुलासा करण्यात आला आहे.
कोरोनाचा पहिला रुग्ण २०१९ वर्षाअखेर चीनमध्ये आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जगात कोरोनाचा कहर दिसून आला होता. आता या संशोधनात चीनमध्ये रुग्णांवर आधारित दीर्घकालीन कोविडचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. विषाणूच्या बाधेतून रुग्ण बरा झाल्यानंतरसुद्धा रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येतात, असे या संशोधनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जापान फ्रेंडशिप हॉस्पिटल इन चायना आणि संशोधनाचे प्रमुख लेखक चीनचे प्राध्यापक बिन काओ सांगतात, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांनी कोरोना मात दिली असली तरी त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळाची आवश्यकता आहे. ज्या रुग्णांना कोरोनाचे परिणाम दीर्घकाळ राहिले असतील, त्यांनी फॉलोअप घेणे आवश्यक आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सामान्यपणे वेळेनुसार सुधारणा झाल्या आहेत. परंतु कोविड रुग्णांचे आरोग्य आणि जीवनमानाची गुणवत्ता सामान्य नागरिकांच्या तुलनेत वाईट राहिली आहे. थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे आणि शांत झोप न लागणे, अशी लक्षणे सामान्यपणे दिसून येतात.
संशोधकांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोविड १९ रुग्णांच्या दीर्घकालीन आरोग्य परिणामांसह लाँग कोविडमुळे होणाऱ्या विशिष्ट आरोग्य परिणामांचे विश्लेषण केले. त्यानुसार, ७ जानेवारी ते २९ मे २०२० या सहा महिन्यांच्या काळात, १२ महिने आणि दोन वर्षांदरम्यान वुहानच्या यिन टॅन रुग्णालयात गंभीर कोविडचा संसर्ग झालेल्या रुग्णांसह १,१९२ सहभागी रुग्णांचा समावेश करण्यात आला होता.
सुरुवातीला आजारी पडल्याच्या सहा महिन्यांनंतर ६८ टक्के सहभागी रुग्णांनी किमान एक लाँग कोविड लक्षण असल्याची माहिती दिली. संसर्गाच्या दोन महिन्यांपर्यंत लक्षणांची व्यापकता कमी होऊन ५५ टक्के झाली होती. थकवा किंवा स्नायूंमध्ये शिथिलता या लक्षणांची सूचना सर्वाधिक वेळा देण्यात आली. अशक्तपणाची तक्रार सहा महिन्यांमध्ये ५२ टक्क्यांहून कमी होऊन दोन वर्षांत ३० टक्के झाली आहे.
कोविडची गंभीर लागण झाल्यानंतरही ८९ टक्के सहभागी रुग्ण दोन वर्षांमध्ये आपल्या मूळ कामावर रुजू झाले होते. सुरुवातील आजारी पडल्याच्या दोन वर्षांनंतर कोविड रुग्णांचे आरोग्य सामान्य नागरिकांच्या तुलनेत वाईट असते. त्यामध्ये ३१ टक्के थकवा किंवा स्नायूंमध्ये शिथिलता आलेली असते, असे अहवालात म्हटले आहे. याच टक्केवारीचे रुग्ण शांत झोप न लागण्याच्या त्रासाच्या तक्रारी करतात.