नाशिक – जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनानुसार येत्या ३ जानेवारी पासून ग्रामीण भागातील १५ ते १८ वयोगटातील सर्व मुला-मुलींना फक्त ( एनटीएजीआय ) यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार फक्त कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे. २००७ पूर्वी जन्माला आलेले मुलं-मुली हे लाभार्थी असणार आहेत. यासाठी कोविंन सिस्टीम वर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच लसीकरणच्या ठिकाणी जाऊनही नोंदणी करता येणार आहे. यासाठी लसीकरण स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात व नगरपालिका क्षेत्रात तसेच महानगरपालिका क्षेत्रात ही व्यवस्था करण्यात येत असून नाशिक जिल्ह्यात एकूण २५ ठिकाणी प्रथम हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहेत.
यामध्ये येवला तालुक्यात नगरसुल ग्रामीण रुग्णालय आणि येवला, चांदवड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय चांदवड व प्रा आ केंद्र उसवाड ,देवळा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय देवळा, उमराणे, प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड, खामखेडा, मेशी, खर्डा, लोहणेर ,सटाणा येथे ग्रामीण रुग्णालय सटाणा,डांगसौंदाणे, नामपुर दिंडोरी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय दिंडोरी, वणी प्रा आ केंद्र तळेगाव ,इगतपुरी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय इगतपुरी, घोटी, प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव, काळुस्ते, कानडवाडी, खेड, नांदगाव सदो , नांदगाव मध्ये संभाजी नगर शहरी आरोग्य केंद्र , नाशिक मध्ये ग्रामीण रुग्णालय गिरणारे ,देवळाली कॉन्टॅमेंटे नागरी उपकेंद्र निफाड मधील उपजिल्हा रुग्णालय निफाड देवगाव, म्हाळसाकोरे, निमगाव, पिंपळगाव ,चांदोरी, देवगाव, पालखेड,पेठ तालुक्यात ग्रामीण रुग्णालय पेठ प्राथमिक आरोग्य केंद्र जोगमोडी प्राथमिक आरोग्य केंद्र, सिन्नर येथे ग्रामीण रुग्णालय दोडी नगरपालिका आणि नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, कळवण तालुक्यात अभोणा ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय कळवण, मालेगाव येथे दाभाडी ग्रामीण रुग्णालय आणि झोडगा त्रंबकेश्वर येथे ग्रामीण रुग्णालय हरसुल उपजिल्हा रुग्णालय त्रंबकेश्वर अशा एकूण ४७ ठिकाणी प्रथम स्तरावर मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे.
टप्प्याटप्प्याने लसीकरण केंद्रात वाढ करण्यात येणार आहे शालेय स्तरावर जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील सर्व मुला मुलींचे लसीकरण आपण वरील आरोग्य केंद्रात जाऊन करून घ्यावे व तिसरी लाट थोपवण्यासाठी हे लसीकरण माझ्या साठी मुलांना देणे गरजेचे आहे आणि महत्त्वाचे आहे यासाठी आरोग्य विभाग विशेष प्रयत्न करीत असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य सभापती सुरेखा दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शैलेश निकम यांनी केले आहे़.