नवी दिल्ली – राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.1 कोटी लस मात्रा ( 95.13 कोटी दुसरी मात्रा आणि 22.41 कोटी वर्धक मात्रा रुपात) देण्यात आल्या आहेत.
– गेल्या 24 तासात 6,675 लस मात्रा देण्यात आल्या.
– भारतातील उपचाराधिन रुग्णांची संख्या 2,670 आहे.
– उपचाराधिन रुग्णांचे प्रमाण 0.01% आहे.
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8% आहे.
– गेल्या 24 तासात 207 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 4,41,45,445 वर पोचली.
– गेल्या 24 तासात 173 नवीन रुग्णांची नोंद झाली.
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.19%)
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.14%)
– आतापर्यंत एकूण 91.1 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात 92,955 चाचण्या करण्यात आल्या.