नवी दिल्ली – देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या एकूण 220.10 कोटी मात्रा (95.13 कोटी दुसरी मात्रा आणि 22.40 कोटी खबरदारीची मात्रा) दिल्या.
-गेल्या 24 तासांत 91,732 मात्रा दिल्या.
-सध्या भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या 3,653 आहे.
-उपचाराधीन कोरोनाबाधितांचा दर 0.01%
-रुग्ण बरे होण्याचा दर 98.8%
-गेल्या 24 तासांत 179 रूग्ण बरे झाले; आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,41,44,029.
-गेल्या 24 तासांत 226 नव्या रुग्णांची नोंद झाली.
-रूग्ण बाधीत होण्याचा दैनंदिन दर 0.12%
-रुग्ण बाधीत होण्याचा साप्ताहिक दर 0.15%
-आतापर्यंत केलेल्या एकूण कोविड चाचण्या -91.07 कोटी;
-गेल्या 24 तासांत 1,87,983 चाचण्या करण्यात आल्या.