कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८४ हजार ४०३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार २७३ रुग्णांवर उपचार सुरु असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १२९ ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ३७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १११, बागलाण ५७, चांदवड ७४, देवळा १८, दिंडोरी ८५, इगतपुरी १८, कळवण ३१, मालेगाव ७२, नांदगाव ४८, निफाड १३२, पेठ ००, सिन्नर २७१, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०२, येवला १९ असे एकूण ९३९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २५५ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ७७ तर जिल्ह्याबाहेरील ०२ रुग्ण असून असे एकूण २ हजार २७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९५ हजार ०४७ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.७१ टक्के, नाशिक शहरात ९७.७३ टक्के, मालेगाव मध्ये ९६.५५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.३१ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार ०४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ८८५ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५६ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ३७१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख ९५ हजार ०४७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ८४ हजार ४०३ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार २७३ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७. ३१ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)