पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
– उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २०२ ने घट
– जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख १२ हजार ६८ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत ३८ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख १२ हजार ०६८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३८ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २०२ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत २ हजार ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार २८९, चांदवड १ हजार ३०२, सिन्नर १ हजार ४१५, दिंडोरी १ हजार ६५, निफाड २ हजार ८५५, देवळा १ हजार १३५, नांदगांव १ हजार ०३, येवला ६७६, त्र्यंबकेश्वर ४८८, सुरगाणा २८३, पेठ १३२, कळवण ५६६, बागलाण १ हजार ३६१, इगतपुरी ४७७, मालेगांव ग्रामीण ८५५ असे एकूण १४ हजार ९०२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार २८४ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९३१ तर जिल्ह्याबाहेरील २६१ असे एकूण ३८ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ५३ हजार ३०३ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८१.०६ टक्के, नाशिक शहरात ८५.३७ टक्के, मालेगाव मध्ये ७८.८९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८९.९४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.७२ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार २१८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३२३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २२६ व जिल्हा बाहेरील ९० अशा एकूण २ हजार ८५७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– २ लाख ५३ हजार ३०३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख १२ हजार ६८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३८ हजार ३७८ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.७२ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)