कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार १०५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ४९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७४ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ८ हजार २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १५०, बागलाण ६९, चांदवड ७३, देवळा २१, दिंडोरी ८४, इगतपुरी १९, कळवण २७, मालेगाव ९८, नांदगाव ७६, निफाड १८३, पेठ ००, सिन्नर ३२९, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०५, येवला १५ असे एकूण १ हजार १४९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २४२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८५ तर जिल्ह्याबाहेरील १४ रुग्ण असून असे एकूण २ हजार ४९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९३ हजार ८७४ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.५९ टक्के, नाशिक शहरात ९७.७५ टक्के, मालेगाव मध्ये ९६.४९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ३ हजार ९६० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ८३९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५४ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार २७९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख ९३ हजार ८७४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ८३ हजार १०५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ४९० पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७. २७ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)