– देशभरात एकूण 86 कोटी 16 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून जगातील एका दिवसातील विक्रमी संख्या
– राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 28.87 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
– गेल्या 24 तासात 42,640 नव्या रुग्णांची नोंद; 91 दिवसात संख्या 50 हजारापेक्षा कमी
– सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ती 6,62,521 वर पोहचली; 79 दिवसानंतर ही संख्या 7 लाखापेक्षा कमी
– देशात आतापर्यंत एकूण 2,89,26,038 जण बरे झाले आहेत
– गेल्या 24 तासात 81,839 जण बरे झाले आहेत
– सलग 40 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
– बरे होण्याचा दर वाढून 96.49% वर पोहोचला आहे.
– साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून सध्या तो 3.21% वर पोहोचला आहे
– दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.56%, सलग 15 व्या दिवशी तो 5% पेक्षा कमी
– चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ; एकूण – 39.40 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत