- भारतात उपचाराधीन रुग्णसंख्येत घट होऊन ही संख्या ७,९८,६५६ झाली आहे, ७३ दिवसांनी ही संख्या ८ लाखापेक्षा कमी
- गेल्या २४ तासात देशात ६२,४८० नव्या रुग्णांची नोंद
- देशात आतापर्यंत एकूण २,८५,८०,६४७ कोरोनामुक्त
- गेल्या २४ तासात ८८,९७७ रुग्ण कोरोनातून बरे झाले.
- दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या, सलग ३६ व्या दिवशी जास्त
- रुग्ण बरे होण्याचा दर ९६.३ टक्के
- साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर ५ टक्के पेक्षा कमी, सध्या हा दर ३.८० टक्के
- दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर ३.२४ टक्के,सलग ११ व्या दिवशी हा दर ५ टक्के पेक्षा कमी
- चाचण्यांच्या क्षमतेत वाढ, एकूण ३८.७१ कोटी चाचण्या करण्यात आल्या.
- राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत २६.८९ कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या.