करोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
– जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ०७ हजार ४७२ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत ३८ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ०७ हजार ४७२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३८ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार १८८, चांदवड १ हजार ३२१, सिन्नर १ हजार २९७, दिंडोरी १ हजार ३२, निफाड २ हजार ७७२, देवळा १ हजार १३१, नांदगांव ९१७, येवला ५९८, त्र्यंबकेश्वर ४३८, सुरगाणा २७४, पेठ १२२, कळवण ६०२, बागलाण १ हजार ३९२, इगतपुरी ५३४, मालेगांव ग्रामीण ९८१ असे एकूण १४ हजार ५९९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार ७८२ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८९४ तर जिल्ह्याबाहेरील ३०५ असे एकूण ३८ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४८ हजार ८६८ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८१.०४ टक्के, नाशिक शहरात ८४.८१ टक्के, मालेगाव मध्ये ७८.९९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.५८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.३७ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार १९२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३१४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २२२ व जिल्हा बाहेरील ८८ अशा एकूण २ हजार ८१६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– २ लाख ४८ हजार ८६८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ०७ हजार ४७२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३८ हजार ५८० पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.३७ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)