कोरोना पॉझिटिव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ९ हजार २७७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ८ हजार ७२१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १३३, बागलाण ३४, चांदवड १९, देवळा १६, दिंडोरी २३३, इगतपुरी ४६, कळवण ३६, मालेगाव २०, नांदगाव ६८, निफाड ४६१, पेठ ०४, सिन्नर ११०, सुरगाणा २०, त्र्यंबकेश्वर २१, येवला २९ असे एकूण १ हजार २५० पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६ हजार ९४०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात१६८ तर जिल्ह्याबाहेरील ३६३ रुग्ण असून असे एकूण ८ हजार ७२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २६ हजार ७६४ रुग्ण आढळून आले आहेत.
*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६३, बागलाण ११, चांदवड ११, देवळा ०२, दिंडोरी ४३, इगतपुरी ३६, कळवण ०८, मालेगाव १७, नांदगाव २६, निफाड ७३, पेठ ००, सिन्नर ३४, सुरगाणा ०२, त्र्यंबकेश्वर ११, येवला १५ असे एकूण ३५१ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.५८ टक्के, नाशिक शहरात ९५.८० टक्के, मालेगाव मध्ये ९५.४७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.९० इतके आहे.
*मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २५२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ३०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७६६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :
– ४ लाख २६ हजार ७६४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ९ हजार २७७ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ८ हजार ७२१ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.९० टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)