नाशिक – अधिकारी – कामगारांनी तरूणीचा छळ व विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराची पीडितेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. अमरीन शेख सय्यद (भाभानगर), राशिद जाटू (मुंबई), मुजम्मील शेख (नाशिक) व योगेश तलवारे (नाशिक) अशी संशयीताची नावे आहे. पोलिसांनी या प्रकरणात विनयभंग सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तलवारे हे व्यवस्थापक आहे.
गडकरी चौकातील एका नामांकित वाहनविक्रीच्या शोरूममध्ये काम करत असतांना हा प्रकार घडला आहे. गेल्या ऑगष्ट महिन्यांपासून संशयीताकडून पीडितेचा कामाच्या ठिकाणी छळ सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यात अश्लिल भाषा वापरून शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यात शेख याने अंडरवर्ल्डची धमकी देत मोबाईल हिसकावून घेत विनयभंग केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.