नाशिक – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यासह महापालिकेचे चार डॉक्टर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हे अधिकारी उपस्थितीत होते. त्यामुळे या बैठकीत या डॅाक्टरांबरोबर संपर्क असलेल्यांचे धाबे दणाणले आहे. तिस-या लाटेत कोरोनाचे रुगण वाढत असून आतापर्यंत जिल्हयात एकुण कोरोना रुग्णांची संख्या १८०० च्या वर गेली आहे. गेल्या काही दिवसात ही वाढ झपाट्याने झाली आहे. त्यात दिंडोरीच्या खासदार तथा केंद्रिय मंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली. आता आरोग्य विभागाशी संबधीत डॅाक्टरांना ही लागण झाली आहे.