मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, अॅानलाईन शाळा मात्र सुरु राहणार आहे. १० वी व १२ वीचे वर्ग मात्र नियमीत सुरु राहणार आहे. राज्यात ओमिक्रॅानचे रुग्ण वाढल्याने सरकारने दक्षता म्हणून अगोदर काही निर्बंध लादले. त्यानंतर आता शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.