कोविड-19 अद्ययावत माहिती
– भारतात दैनंदिन स्तरावर एक लाख व्यक्ती नव्याने कोविड बाधित, बाधितांच्या संख्येचा ६१ दिवसांतील नीचांक
– भारतात सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत सतत घसरण होत ती १४,०१,६०९ वर पोहचली
– गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रीय रुग्णसंख्येत एकूण ७६,१९० ने घट
– देशात आतापर्यंत एकूण २,७१,५९,१८० व्यक्ती कोविड-19 मुक्त
– गेल्या २४ तासांत १,७४,३९९ रुग्ण कोविडमधून मुक्त
– देशात दैनंदिन पातळीवर रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग २५ व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा अधिक
– रोगमुक्ती दर वाढून ९३.९४ टक्के इतका
– साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर आत ६.२१ टक्के
– दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर ६.३४ टक्के सलग १४ व्या दिवशी १० टक्के हून कमी
– चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ – आतापर्यंत एकूण ३६ कोटी ६० लाख चाचण्या
– देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या २३ कोटी २७ लाख मात्रा