कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७६ हजार ८९६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ६ हजार ७४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४५० ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ९१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४६४, बागलाण २४२, चांदवड २३५, देवळा ९२, दिंडोरी ३७०, इगतपुरी ७८, कळवण २३३, मालेगाव १८६, नांदगाव २०८, निफाड ५२०, पेठ १७, सिन्नर ७१५ , सुरगाणा २९, त्र्यंबकेश्वर १०, येवला ९२ असे एकूण ३ हजार ४९१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ४२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १९५ तर जिल्ह्याबाहेरील २० रुग्ण असून असे एकूण ६ हजार ७४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ५६१ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९५.९८ टक्के, नाशिक शहरात ९७.७१ टक्के, मालेगाव मध्ये ९५.८६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.०० इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण २ हजार ३९६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २ हजार १०२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३१९ व जिल्हा बाहेरील १०० अशा एकूण ४ हजार ९१७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख ८८ हजार ५६१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ७६ हजार ८९६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ६ हजार ७४८ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७. ०० टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)