-भारतात गेल्या २४ तासांत १ लाख २० हजार दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद; ५८ दिवसातला नीचांक
-सलग ९ व्या दिवशी दैनंदिन पातळीवर नोंद झालेल्या नव्या बाधितांची संख्या २ लाखांहून कमी
-घसरणीचा कल कायम राखत भारतातील सक्रिय रुग्णसंख्या १५,५५,२४८ वर पोहचली
-गेल्या २४ तासात सक्रिय रुग्णसंख्येत ८०,७४५ ची घट
-देशात आतापर्यंत २.६७ कोटी रुग्ण कोविड आजारातून बरे झाले
-गेल्या २४ तासांत १,९७,८९४ रुग्ण बरे झाले
-सलग २३ व्या दिवशी दैनंदिन पातळीवर नव्या बाधितांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
-राष्ट्रीय स्तरावर रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९३.३८ टक्के
-साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या ६.८९ टक्के
-दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आणखी कमी होऊन सध्या ५.७८ टक्के वर; १० टक्के हून कमी पॉझिटीव्हिटी दर नोंदला जाण्याचा कल सलग १२ व्या दिवशी कायम
-भारताने आतापर्यंत एकूण ३६.१कोटीहून अधिक चाचण्या केल्या
-देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या २२ कोटी ७८ लाखांहून अधिक मात्रा दिल्या गेल्या